सोन्याचे दागिने हिसकावले १२ घंट्यांमध्ये आरोपी जेरबंद

रांजणगाव गणपति (जिल्हा पुणे) – शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील एक युवती आणि तिचा मामेभाऊ रात्रीच्या वेळेस घराजवळच गप्पा मारत बसले होते. तेव्हा २ व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवत त्यांना मारहाण केली. त्या २ जणांनी युवतीवर बलात्कार केला. या प्रकरणी आरोपी अमोल पोटे आणि किशोर काळे या दोघांना रांजणगाव एम्.आय.डी.सी. पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेने तक्रार प्रविष्ट केल्यानंतर घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी १२ घंट्यांमध्ये आरोपींना अटक केली.
१. पीडिता घराशेजारी बोलत असतांना २ आरोपींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून प्रथम शरीरसंबंध करण्यास भाग पाडले.
२. एकापाठोपाठ एक अशा पद्धतीने आरोपींनी पीडितेला ‘आणखी लोकांना बोलवू’, अशी धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले.
३. पीडितेने घडलेला प्रसंग बहिणीला सांगितला. त्यांनी ११२ या क्रमाकांवर घडलेला प्रसंग सांगितला. पोलिसांनी तात्काळ दखल घेत १२ घंट्यांमध्ये आरोपींना अटक केली.
संपादकीय भूमिका :
|