देहली येथे दोघांना घेतले कह्यात, आरोपी ८ वर्षे मुलीच्याच घरी रहात होता

खेड (पुणे) – एका परप्रांतीय तरुणाला घरामध्ये ८ वर्षे आसरा दिला. त्या रिजवान आलम या तरुणाने घरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला विवाहाचे आमीष दाखवून पळवून देहली येथे नेले. तिच्यावर वारंवार बलात्कार केला. खेड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित कारवाई करत त्या दोघांना देहली येथे कह्यात घेतले.
१. राजगुरुनगर जवळील एका गावातील मुलगी २२ फेब्रुवारी या दिवशी गायब झाली. त्याबरोबरच कामाला असलेला रिजवानही गायब झाला होता. त्या दोघांची तक्रार घरच्यांनी खेड पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली.
२. अल्पवयीन मुलीला देहली येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केले. धर्मांधाने मुलीबरोबर विवाहाची सिद्धता केली होती. पोलिसांनी तत्परतेने अटक केल्यामुळे विवाह झाला नाही.
३. आरोपी हा मूळचा बिहारचा आहे. त्याला मुलीच्या कुटुंबियांनी ८ वर्षे घरामध्ये आसरा दिला होता. घरामध्ये राहूनच त्याने अल्पवयीन मुलीला फूस लावली.
संपादकीय भूमिका :धर्मांधांना घरामध्ये आसरा देणे किती धोक्याचे आहे, हे दर्शवणारी घटना ! |