
मुंबई – कुठल्याही पोलिसाचा अमली पदार्थांशी संबंध आढळल्यास त्याचे निलंबन न करता थेट बडतर्फ करण्यात येईल, अशी चेतावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. १ मार्च या दिवशी झालेल्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या परिषदेनंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.