मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर आक्रमण करण्याची धमकी !

  • पाकिस्तानी क्रमांकावरून संदेश आल्याची माहिती

  • गुन्हा नोंद

देवेंद्र फडणवीस

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर आक्रमण करण्याच्या धमकीचा संदेश मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सअ‍ॅपवर मिळाला. या प्रकरणी अन्वेषण चालू होते. हा संदेश एका पाकिस्तानी क्रमांकावरून आला होता. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून संदेश पाठवणार्‍याचे नाव मलिक शहाबाझ हुमायून असे आहे. या संदेशानंतर मुख्यमंत्री कार्यालय आणि मुंबईतील इतर संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारे धमक्या देणार्‍यांना कठोर शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !