येऊर (ठाणे) येथील हिंदूंनी २ बैलांची होणारी हत्या रोखली !

महाशिवरात्रीला मुंब्रा येथील धर्मांध मुसलमानांकडून बैलांच्या हत्येचा कट !

ठाणे – महाशिवरात्रीच्या दिवशी मुंब्रा येथील धर्मांध मुसलमानांनी बैलांच्या हत्येचा कट रचला होता; पण येऊर येथील हिंदूंच्या सतर्कतेमुळे तो यशस्वी झाला नाही. (जी माहिती हिंदूंना मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांना का मिळत नाही ?  – संपादक) येऊर गावातील शेतकरी विलास रघुनाथ बरफ यांच्या २ बैलांना इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून नेण्याचा धर्मांध मुसलमानांचा डाव होता; मात्र स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे एका धर्मांध मुसलमानाला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्या चौकशीतून अन्य ९ आरोपींची नावे उघड झाली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून ५ जणांच्या मुसक्या आवळल्या असून उर्वरित आरोपींचा शोध चालू आहे. फरमान रियाज शेख याच्यासह अदनान अनीस सैयद, आयानी आसाद अन्सारी, सीराज उपाख्य बिल्ली, नौशाद, शफीक, आल्तमस, शायान शेख, अजहर आणि अप्पू अशी त्यांची नावे आहेत.

संबंधित शेतकर्‍याच्या गोठ्यात ५ बैल आणि ४ गायी आहेत. प्रतिदिन ते सकाळी ८ वाजता ते गुरांना चरण्यासाठी येऊरच्या जंगलात सोडतात. सायंकाळी ७.३० पर्यंत सर्व जनावरे चरून गोठ्यात परततात. महाशिवरात्रीच्या दिवशी दोन बैल गोठ्यात परतलेच नाहीत. पहाटे ३ वाजता शेतकर्‍याला संपर्क करून एकाने कळवले की, काही लोक इंजेक्शन देऊन बैलांना बेशुद्ध करून चोरून नेत आहेत. (हिंदूंनो, गुरांना चरायला पाठवल्यावर सतर्क रहा ! आपली गुरे धर्मांधांच्या तावडीत अडकत नाहीत ना, याकडे लक्ष ठेवा ! – संपादक) तेव्हा येऊर गावातील ग्रामस्थांनी तत्परतेने तेथे जाऊन फरमान रियाज शेख यास पकडले. सध्या दोन्ही बैल सुखरूप आहेत.

संपादकीय भूमिका

राज्यात हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना गोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही कधी होणार ? त्या कायद्यांतर्गत अटकेतील धर्मांध कसायांना, तस्करांना  कठोर शिक्षा कधी होणार ?