‘एका ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ‘फ्यूजन’(टीप) या संगीत प्रकाराचे देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्म परीक्षण करता आले. ते पुढे दिले आहे.
टीप – ‘फ्यूजन’: दोन किंवा त्याहून अधिक संगीतशैली एकत्र करून नवीन संगीत सिद्ध करणे

१. ६.१२.२०२४ या दिवशी केलेले सूक्ष्म परीक्षण
अ. नृत्य पहातांना त्यात निर्जीवता जाणवत होती.
आ. त्या नृत्यांगनेने उंच टाचेचे बूट (पादत्राणे) घातले होते. ती नृत्य करतांना त्या बुटांचा भूमीवर जोरजोराने आवाज करत होती. त्या वेळी माझे डोके जड झाले. बुटांच्या आवाजामुळे ‘केसांचा गुंता दिसतो’, त्याप्रमाणे वातावरणात सूक्ष्मातून काळे तरंग निर्माण झाले होते. हे काळ्या रंगाचे गुंतागुंतीचे तरंग श्रोत्यांच्या भोवती जमा झाले होते. त्यामुळे श्रोत्यांचे मन चंचल होऊन त्यांची बुद्धी भ्रमित होण्याची प्रक्रिया घडली. थोड्या वेळाने पादत्राणांच्या आवाजामुळे वातावरणात सूक्ष्मातून मायावी अग्नीची निर्मिती झाली.
इ. कार्यक्रमातील एका गाण्यावर पाताळांतील अनेक वाईट शक्ती आसुरी आनंदाने डोलत होत्या. ‘हातात दारूच्या बाटल्या घेऊन काही वाईट शक्ती नाचत आहेत’, असे मला दिसले. ही कृती करून वाईट शक्तींनी कार्यक्रमातील त्यांचा सहभाग व्यक्त केला.
ई. दोन नृत्यांगना नृत्य करत असतांना कार्यक्रमाच्या ठिकाणी सूक्ष्मातून मर्मेड (टीप) नावाच्या वाईट शक्ती आकर्षित झाल्या.
टीप : मर्मेड – त्यांना ‘मत्स्यांगना’ म्हणतात. त्या वाईट शक्तीला स्त्रीचे डोके असते आणि त्याखालील भाग हा माशाच्या आकाराप्रमाणे असतो.
उ. पाताळातील वाईट शक्ती हा कार्यक्रम पहात असतांना एक वाईट शक्ती दुसर्या वाईट शक्तीला म्हणाली, ‘असे कार्यक्रम नियमित व्हायला हवेत.’ तेव्हा मला जाणवले, ‘अशा कार्यक्रमांमुळे वाईट शक्तींना वातावरणात काळ्या शक्तीचे पुष्कळ प्रक्षेपण करता येते. त्यामुळे ती वाईट शक्ती अशा प्रकारे बोलली.’
ऊ. कार्यक्रमात नृत्य आणि गायन एकत्रितपणे चालू होते. तेव्हा वातावरणातील अनेक वाईट शक्ती गोल आकारात नृत्य करतांना दिसल्या. त्या नृत्याद्वारे वातावरणात सोनेरी, पांढरा, गुलाबी आणि हिरवा या रंगांचे मायावी कण निर्माण झाले.
२. ७.१२.२०२४ या दिवशी केलेले सूक्ष्म परीक्षण
अ. भारतीय नृत्य आणि पाश्चात्त्य नृत्य यांचे एकत्रित सादरीकरण होते. तेव्हा माझ्या मनाला रूक्षता जाणवत होती; कारण या नृत्यांच्या एकत्रीकरणामुळे शुद्ध भारतीय नृत्यातील सात्त्विकता हरपली होती.
आ. कार्यक्रमात तबलावादन आणि शंखनाद केल्यावर वातावरणात काही प्रमाणात सात्त्विकता प्रक्षेपित होत होती; मात्र त्या वेळी अन्य पाश्चात्त्य वाद्यांमुळे ही सात्त्विकता नष्ट होत होती. हे ऐकतांना माझे डोक जड आणि सुन्न झाले.
इ. भारतीय वाद्ये आणि नृत्य यांतील सात्त्विकता नष्ट करण्यासाठी वाईट शक्तींनी त्याला पाश्चात्त्य वाद्ये आणि पाश्चात्त्य नृत्य यांची जोड दिली. परिणामी भारतीय संगीतातील सात्त्िवकता नष्ट झाली.
ई. ‘फ्यूजन संगीत प्रकाराची निर्मिती होणे’, हे वाईट शक्तींचे भारतीय संगीतावरील मोठे आक्रमण आहे !’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.२.२०२४)
|