Rajasthan Missing Hindu Girls : राजस्थानमधील अजमेरमध्ये एका वर्षात २५१ हिंदु मुली बेपत्ता !

मुसलमान टोळीचा हात

प्रतिकात्मक चित्र

अजमेर (राजस्थान) – १९९० च्या दशकात राजस्थानातील अजमेरमध्ये एक वासनाकांड उघडकीस आले होते. यामुळे संपूर्ण देश हादरला होता. त्या वेळी अजमेर दर्ग्याशी संबंधित मुसलमान नेत्यांनी हिंदु मुलींना अडकवून त्यांचे लैंगिक शोषण केले होते. वर्ष २०२५ मध्ये आता अजमेरजवळील ब्यावर भागात अशीच घटना उघडकीस आली आहे. येथील मुसलमान मुलांच्या टोळीने शाळेत शिकणार्‍या हिंदु मुलींना त्यांच्या जाळ्यात अडकवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. राजस्थान विधानसभेच्या अध्यक्षांनी सांगितले आहे की, अजमेरमधून २५० हून अधिक हिंदु मुली बेपत्ता झाल्या आहेत.

१. राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष वासुदेव देवनानी यांनी याविषयी चिंता व्यक्त केली आहे. राजस्थान विधानसभेत यासंबंधीची आकडेवारी नुकतीच समोर आली आहे.

२. अजमेर जिल्ह्यातील मानवी तस्करी शाखेचे प्रमुख अशोक बिश्नोई म्हणाले की, गेल्या एका वर्षात ३१० मुले बेपत्ता होण्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. त्यांपैकी २५१ मुली होत्या.

३. अजमेरमधून हरवलेली काही मुले सापडली आहेत, असे पोलिसांनी सांगितले. यासाठी तंत्रज्ञानाचेही साहाय्य घेतले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मुलांचे अपहरण करणार्‍यांना अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

राजस्थानमध्ये भाजपची सत्ता असतांना असे होणे अपेक्षित नाही ! हिंदूंच्या आई-बहिणींकडे वक्र दृष्टीने पहाण्याचे कुणाचे धारिष्ट्य होणार नाही, एवढा दरारा सरकारी यंत्रणंनी निर्माण करणे आवश्यक !