
ओटावा (कॅनडा) – कॅनडातील ओंटारिओ येथील हॅमिल्टन बस थांब्यावर बसची वाट पहात उभ्या असणार्या २१ वर्षीय हरसिमरत रंधावा या भारतीय विद्यार्थिनीला गोळी लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. २ वाहनातून एकमेकांवर गोळीबार करत असतांना त्यांपैकी एक गोळी हरसिमरतला लागली. मागील ४ मासांमध्ये ४ भारतीय विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या घटनांत मृत्यू झाले आहेत.
🇨🇦 Hamilton Tragedy: Indian student Harsimrat Randhawa (21) killed by stray bullet.
The shocking incident raises fresh concerns about the safety of international students in Canada. pic.twitter.com/DQguWPV8Ka
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 19, 2025
सदर घटनेनंतर टोरंटोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने शोक व्यक्त करत म्हटले की, हरसिमरत निष्पाप असून गोळीबाराशी तिचा काही एक संबंध नव्हता. आम्ही तिच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहोत. त्यांना आवश्यक ते सर्व साहाय्य करण्यात येत आहे.