पुणे – ‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’ या आजाराच्या प्रादुर्भावाशी कुक्कुट पक्ष्यांचा संबंध असण्याची शक्यता पडताळून पहाण्याच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशांनुसार खडकवासला धरण परिसरातील कुक्कुट पक्ष्यांचे क्लॉॲकल स्वॅब नमुने, विष्ठा नमुने, पाण्याचे नमुने संकलित करून ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’मध्ये परीक्षणासाठी पाठवण्यात आले, अशी माहिती पशूसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिली.
खडकवासला धरण परिसरात जी.बी.एस्. आजाराच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पशूसंवर्धन विभागाच्या पथकाने बाधित क्षेत्रालगत परिसरातील ११ कुक्कुट प्रक्षेत्रांना भेट दिली.