
‘रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमातील कोटा लाद्यांमध्ये ‘प्रतिबिंब दिसणे’ आणि त्या ‘गुळगुळीत होणे’, असे पालट काही वर्षांच्या कालावधीनंतर आपोआप झाले आहेत. या संदर्भात संशोधन करून त्यांचा कार्यकारणभाव शोधून काढण्यासाठी साधक प्रयत्न करत आहेत. ‘लाद्यांमध्ये हे पालट कशामुळे झाले ?’, तसेच ‘हे पालट मोजण्यासाठी कोणती वैज्ञानिक उपकरणे वापरावीत ?’, याविषयी तज्ञ, अभ्यासू, तसेच या विषयात शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांचे साहाय्य आम्हाला लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’
ई-मेल : mav.research2014@gmail.com
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, फोंडा, गोवा