सनातन संस्‍कृतीचा अमूल्‍य ठेवा पुढील पिढीपर्यंत पोचवण्‍याचे अनमोल कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे ! – स्‍वामी प्रबुद्धानंद पुरी, सचिव, इंटरनॅशनल वेदांत सोसायटी

स्‍वामी प्रबुद्धानंद पुरी

प्रयागराज – इंटरनॅशनल वेदांत सोसायटीचे सचिव स्‍वामी प्रबुद्धानंद पुरी यांनी महाकुंभक्षेत्री लावण्‍यात आलेल्‍या हिंदु जनजागृती समितीच्‍या प्रदर्शनाला भेट दिली. हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी या सर्वांना समितीच्‍या कार्याची सविस्‍तर माहिती दिली. या वेळी स्‍वामी प्रबुद्धानंद पुरी म्‍हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य प्रशंसनीय आहे. सनातन संस्कृतीचा अमूल्य ठेवा पुढील पिढीपर्यंत पोचवण्याचे अनमोल कार्य समिती करत आहे. या कार्याने मी प्रभावित झालो आहे. समितीच्या कार्याचा भारतभर प्रसार व्हावा, यासाठी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या या कार्यात आपण सर्व एकत्रित कार्य करू.’’