बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्यासाठी सरकार आणि नागरिक यांनी एकत्र येऊन ठोस कृती करावी ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

करावे गाव, सीवूड्स येथील ग्रामस्थांचा हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार !

सभेत मार्गदर्शन करताना श्री प्रसाद वडके

नवी मुंबई – देशभरात बांगलादेशी घुसखोरांचा धोका वाढत असून नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण भागांत बांगलादेशी घुसखोरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नवी मुंबईत बांगलादेशी घुसखोरांना कोणत्याही परिस्थितीत आश्रय दिला जाणार नाही, अशी भूमिका घ्या. बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्यासाठी सरकार आणि नागरिक यांनी एकत्र येऊन ठोस कृती करावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी केले. ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ट्रस्ट, करावे गाव, सीवूड्स येथे ९ फेब्रुवारी या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते. या सभेला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदु धर्मप्रेमी उपस्थित होते. श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या साक्षीने हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार या वेळी  ग्रामस्थांनी केला.

हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करूया ! – वैद्य उदय धुरी, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती 

हिंदु धर्मातील आचारधर्माचे पालन करून योग्य साधना केल्यास आनंदी जीवन जगता येईल. हिंदूंच्या विरोधात सुनियोजित षड्यंत्रे रचली जात असून लव्ह जिहाद, हलाल जिहाद, वक्फ बोर्डाचा लँड जिहाद, बांगलादेशियांची घुसखोरी असे विविध प्रकारचे आघात हिंदूंवर होत आहेत. त्यामुळे हिंदूंनी कृतीशील होऊन हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करूया.

वैद्य उदय धुरी (डावीकडे) यांच्या हस्ते धर्मप्रेमी श्रवणकुमार पुरोहित यांचा सत्कार भाजप सीवुड्स करावे मंडळाचे अध्यक्ष (१) जयवंत तांडेल वैद्य उदय धुरी यांचा सत्कार करतांना
भाजप सीवुड्स करावे मंडळाचे अध्यक्ष जयवंत तांडेल (१) श्री. प्रसाद वडके यांचा सत्कार करतांना वैद्य उदय धुरी व्यासपिठावरून संवाद साधतांना

या सभेत धर्मप्रेमी श्री. अनंत सातपुते यांनी येथील स्थानिक अनधिकृत ‘पीरबली शहा दर्गा’च्या विश्वस्तांच्या विरोधात गेल्या १४ वर्षांपासून माहिती-अधिकाराचा अवलंब करत दिलेल्या न्यायालयीन लढ्याविषयी माहिती या वेळी दिली. हिंदु राष्ट्राची शपथ ग्रहण करून सभेची सांगता करण्यात आली.

साहाय्य आणि आभार

या सभेस श्री विठ्ठल-रुक्मिणी मारुति मंदिराच्या विश्वस्तांनी सभागृह उपलब्ध करून दिले. त्यांचे, तसेच सभेसाठी साधनसामग्री उपलब्ध करून दिल्याविषयी आणि विशेष सहकार्य केल्याविषयी भाजप सीवूड्स करावे मंडळाचे अध्यक्ष जयवंत तांडेल, माजी नगरसेवक श्री. दीपक पवार, धीरज मढवी, कुणाल महाडीक, रवी म्हात्रे, कृष्णा दुबे, गोविंद दुबे, रवींद्र मढवी, तुषार मुखर्जी, बलराज झिरे, दीपक गावडे, श्रवणकुमार, संतोष यादव आदींचे या वेळी आभार मानण्यात आले.