|

वॉशिंग्टन/ढाका – गेल्या वर्षी ५ ऑगस्टला तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशातून पळ काढावा लागला होता. त्या कालावधीत देशव्यापी हिंसाचार झाला. यामागे अमेरिका असल्याचे सांगितले जात असतांना त्यात तथ्य आहे, असे म्हणायला आता हरकत नाही. अमेरिकेच्या ‘इंटरनॅशनल रिपब्लिकन इन्स्टिट्यूट’चा (‘आय.आर्.आय.’चा) एक गुप्तचर अहवाल फुटला असून त्यात बांगलादेशातील शेख हसीना यांचे सरकार उलथवून लावण्यासाठीच्या मोहिमांना तत्कालीन जो बायडेन सरकारने निधी पुरवला होता, असे म्हटले आहे. वर्ष २०२० मध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाला या संस्थेने अहवाल सादर केला होता. हा अहवाल १ मार्च २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत बांगलादेशात ‘आय.आर्.आय.’ने आयोजित केलेल्या मोहिमांविषयी आहे.
🚨 Leaked U.S. State Dept. Report Claims: Biden Administration Was Behind the Fall of Sheikh Hasina’s Government! 🇺🇸🔍
The U.S. International Republican Institute allegedly ran a massive campaign in Bangladesh using Biden admin funds! 💰📢
Let’s not forget—this American agenda… pic.twitter.com/8HpAhB0zGo
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 10, 2025
अहवालानुसार अशा प्रकारे उलथवून लावण्यात आले बांगलादेशाचे सरकार !
१. शेख हसीना यांचे सरकार पाडण्याचे काम ४ वर्षांपूर्वी चालू झाले होते.
२. यासाठी ‘आय.आर्.आय.’च्या पथकाने एप्रिल आणि मे २०१९ या दोन महिन्यांच्या कालावधीत राजधानी ढाका, सिल्हेट, राजशाही, खुलना आणि चितगाव यांसह बांगलादेशातील अनेक शहरांमध्ये गावपातळीवर माहिती देणार्यांशी बोलण्यास आरंभ केला होता. बांगलादेशाचे राजकारण अस्थिर करण्यासाठी सहकार्य करण्यास सहमती दर्शविणार्या १७० हून अधिक लोकशाही समर्थक कार्यकर्त्यांची या कालावधीत ओळख निश्चित करण्यात आली. संस्थेने या मोहिमेला ‘बदलाचा सिद्धांत’ म्हणून नाव दिले.
३. शेख हसीना यांच्या राजवटीत असमाधानी लोकांची ओळख पटवून त्यांनाही प्रशिक्षित करण्यात आले.
४. थेट ‘आय.आर्आय.’चे प्रशिक्षण घेतलेल्या या लोकांनी त्यांच्या स्तरावर विविध कार्यशाळा आयोजित करण्यास आरंभ केले. सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे लोकांना जोडण्यास आरंभ करण्यात आला, तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजनही चालू झाले. या मोहिमेद्वारे बांगलादेशातील कलाकार, कार्यकर्ते आणि नागरिक यांना एकत्र आणले गेले.
५. यासमवेत विरोधी राजकीय पक्ष ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’चे राजकारणी आणि खासदार यांच्याशी चर्चा करण्यात आली. ते सरकारविरोधी चळवळीसाठी लगेच तयार झाले. (भारतातील काँग्रेस आणि साम्यवादी यांना हाताशी धरून विदेशी शक्ती केंद्र सरकार अन् विशेषकरून हिंदु धर्म यांच्याविरुद्ध कशा प्रकारे कटकारस्थान रचत आहेत, हे कळण्यासाठी बांगलादेशाच्या या मोहिमांतून लक्षात येते ! – संपादक)
६. बांगलादेशी कलाकार तौफिक अहमद यांना दोन गाणी तयार करण्यासाठी निधी पुरवण्यात आला होता. ‘तुई पॅरिश’ (तुम्ही करू शकता) आणि ‘ए दाई खर’ अशी या गाण्यांची नावे आहेत. बांगलादेशी सरकारविरुद्ध निराशा आणि असंतोष निर्माण करण्यासाठी ही गाणी रचण्यात आली. त्यांच्याद्वारे बांगलादेशात सामाजिक आणि राजकीय सुधारणांचे आवाहन करण्यात आले. विशेषकरून ‘तुई पॅरिश’ गाणे कठीण काळात तरुणांना शक्तीचा संदेश देऊन प्रेरित करते आणि बांगलादेशात लोकशाही सशक्त करण्यासाठी वचनबद्ध असलेल्यांना ‘निषेध आणि रस्त्यावरील आंदोलने यांसह सर्व शक्य मार्ग अनुसरा’, यासाठी प्रोत्साहित करते.
७. बांगलादेशातील शेख हसीना यांचे सरकार पाडणे, हे आपले खरे ध्येय आहे, असे आंदोलकांच्या मनावर बिंबवण्यात आले.
८. बायडेन सरकार आय.आर्.आय.ला निधी देत होते. ही संस्था सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि मानवाधिकार कार्यकते यांचा वापर करून देशांच्या सरकारांना उलथवून टाकण्याचे काम करते.
‘इंटरनॅशनल रिपब्लिकन इन्स्टिट्यूट’ची माहिती !
आंतरराष्ट्रीय रिपब्लिकन संस्थेची (आय.आर्.आय.ची) स्थापना वर्ष १९८३ मध्ये ‘नॅशनल एंडोमेंट फॉर डेमोक्रसी’ या अमेरिकी विभागाच्या अंतर्गत झाली. सध्या या संस्थेच्या संचालक मंडळात एक अमेरिकी खासदारही आहे. त्याखेरीज अनेक माजी अमेरिकी अधिकारी आणि कर्मचारी आहेत. ही संस्था दावा करते की, ती एक निःपक्षपाती संघटना आहे, जिचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. या संस्थेला प्रामुख्याने अमेरिकेचा परराष्ट्र विभाग, जॉर्ज सोरोस यांचे ‘यू.एस्.ए.आय.डी.’ आणि ‘नॅशनल एंडोमेंट फॉर डेमोक्रसी (एन्.ई.डी.)’ यांच्याकडून निधी दिला जातो.
संपादकीय भूमिकाअमेरिकेचा हा अजेंडा (कार्यसूची) भारतातही कार्यरत होता, हे विसरता कामा नये. भारतात नागरिकत्व सुधारणा कायदा, कृषी कायदे आदींना विरोध करण्याच्या नावाखाली जो हिंसाचार भडकला, त्यामागेही अमेरिकी शक्तीच होत्या ! |