Kerala Muslims Population : केरळमध्ये मुसलमानांची वाढ हिंदूंपेक्षा ५ पटींनी अधिक ! – सेंटर फॉर पॉलिसी स्टडीज’

‘सेंटर फॉर पॉलिसी स्टडीज’च्या अहवालातील माहिती

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमध्ये हिंदूंच्या लोकसंख्येपेक्षा मुसलमानांची लोकसंख्या अर्धी आहे; मात्र मुसलमानांकडून सर्वाधिक मुले जन्माला घातली जात आहेत. केरळमध्ये जन्माला येणारी सुमारे ४४ टक्के मुले मुसलमान आहेत. दुसरीकडे मुसलमानांंमध्ये मृत्यूची संख्या त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत खूपच अल्प आहे. यामुळे हिंदूंच्या तुलनेत मुसलमानांच्या लोकसंख्येत प्रतिवर्षी वाढ होत आहे. मुसलमानांची वाढ हिंदूंपेक्षा ५ पटींनी अधिक आहे. ही वस्तूस्थिती ‘सेंटर फॉर पॉलिसी स्टडीज’च्या अहवालात देण्यात आली आहे.

१. ‘भारतातील धार्मिक लोकसंख्याशास्त्र : वाढता धार्मिक असमतोल’, असे या अहवालाचे नाव आहे. या अहवालात वर्ष २००८ ते २०२१ पर्यंत केरळमधील हिंदु, मुसलमान, ख्रिस्ती आणि इतर समुदाय यांच्या आकडेवारीवर संशोधन करण्यात आले आहे. या अहवालात नवीन जन्म, मृत्यू आणि या समुदायांमधील लोकसंख्येवर त्यांचा होणारा परिणाम यांबद्दल चर्चा करण्यात आली आहे.

२. यात म्हटले आहे की, वर्ष २०१६ पासून केरळमधील मुसलमानांमध्ये सर्वाधिक मुले जन्माला येत आहेत. वर्ष २०१६ मध्ये केरळमध्ये २ लाख ७ सहस्र हिंदु मुले जन्माला आली, तर याच काळात २ लाख ११ सहस्र मुसलमान मुले जन्माला आली. वर्ष २०१७ मध्येही अशीच परिस्थिती होती. तेव्हा २ लाख १० सहस्र ७१ हिंदु मुले जन्माला आली होती, तर मुसलमानांची २ लाख १६ सहस्र ५२५ मुले जन्माला आली होती. वर्ष २०२० पर्यंत असेच चालू राहिले. केवळ वर्ष २०२१ हे हिंदु मुलांची संख्या वाढण्याचे वर्ष होते.

३. राज्यात हिंदु लोकसंख्या सुमारे ५५ टक्के अणि मुसलमान लोकसंख्या अंदाजे २७ टक्के  असतांना हे घडत आहे. वर्ष २००८ मध्ये केरळमध्ये जन्मलेल्या मुलांमध्ये ४५ टक्के हिंदु होते, तर ३६ टक्के मुसलमान होते. ख्रिस्ती अंदाजे १७.५ टक्के होते; परंतु वर्ष २०२० पर्यंत, एकूण जन्मांमध्ये हिंदु मुलांचा वाटा ४१.४ टक्क्यांपर्यंत अल्प झाला, तर त्याच काळात एकूण जन्मांमध्ये मुसलमान मुलांचा वाटा ४४ टक्क्यांपर्यंत वाढला.

४. वर्ष १९५० पासून केरळमध्ये मुसलमानांची लोकसंख्या सर्वांत वेगाने वाढत आहे. वर्ष २००१ ते २०११ या काळात केरळमध्ये हिंदु लोकसंख्या केवळ २.२३ टक्के आणि ख्रिस्ती  लोकसंख्या केवळ १.३८ टक्के वाढली, तर या काळात मुसलमानांची लोकसंख्या १२.८ टक्के वाढली.

५. वर्ष २००८ ते २०२१ या काळात केरळमध्ये मृत्यूमुखी पडणार्‍या मुसलमानांचे प्रमाण  सुमारे २० टक्के होते, जे त्यांच्या २६.५ टक्के लोकसंख्येपेक्षा खूपच अल्प आहे. या उलट हिंदूंमध्ये मृत्यूचे प्रमाण अनुमाने ६० टक्के आहे.

६. केरळच्या लोकसंख्येत प्रतिवर्षी १ लाखांहून अधिक मुसलमानांची भर पडत आहे. वर्ष २०२१ मध्ये १ लाख ४ सहस्र नवीन लोक मुसलमान समुदायात सहभागी झाले आहेत, तर हिंदूंची लोकसंख्या केवळ १ सहस्र ९९ ने वाढली आहे. ख्रिस्ती लोकसंख्येत ६ सहस्र २१८ ने घट झाली आहे. (यामध्ये अनधिकृत रहाणार्‍या बांगलादेशी मुसलमान घुसखोरांची गणती नाही, हेही विसरता कामा नये ! – संपादक)

७. वर्ष २०११-२० या काळात लोकसंख्येतील मुसलमानांचा वाटा २६ टक्क्यांवरून २९ टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे. त्याच वेळी, केरळच्या लोकसंख्येतील हिंदूंचा वाटा अल्प होत आहे. येत्या काळात ही तफावत वाढतच राहू शकते, असे अहवालात म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

यातून पुढील ३०-४० वर्षांत केरळ बहुसंख्य मुसलमान असणारे राज्य ठरेल, असेच दिसून येते. असे झाल्यावर केरळचे काश्मीर झाल्यास आश्‍चर्य वाटू नये ! ही स्थिती येण्यापूर्वी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक झाले आहे !