हडपसर (पुणे) – बालिका सूर्यवंशी आणि संगीता लांडगे यांनी हडपसर गाडीतळ परिसरात पदपथावर चुकीच्या पद्धतीने दुचाकी उभी केली होती. या प्रकरणी वाहतूक पोलीस कर्मचारी आजीनाथ आघाव हे दुचाकी उचलून वाहन नेणार्या (टोईंग) गाडीत ठेवत होते. त्या वेळी त्या दोघींनी त्यांच्याशी वाद घातला. धक्काबुक्की करून चपलेने मारहाण केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोन्ही महिलांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार आजीनाथ आघाव यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
संपादकीय भूमिकामहिलांकडून मार खाणार्या पोलिसांना प्रशिक्षण दिले जात नाही का ? असा प्रश्न उपस्थित होतो ! असे सुस्त पोलीस कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार ? |