पुणे – शहरातील २ वेगवेगळ्या कारवायांमध्ये गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत ८४ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. कोरेगाव पार्क येथील ‘क्लोअर गार्डन सोसायटी’ परिसरात प्रणव रामनानी, गौरव दोडेजा यांच्याकडून ६७ लाख ८ सहस्र रुपयांचा २ ग्रॅम ७८ मिलीग्रॅम कोकेन, १३६ ग्रॅम ६४ मिलीग्रॅम ओजीकुश गांजा यांसह २ चारचाकी गाड्या जप्त केल्या. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथक २ ने केली.
लोणकर वस्ती येथील ‘जानाई बंगल्या’समोर भरतकुमार राजपुरोहित, आशुसिंह गुमानसिंह यांच्याकडून ४० किलो ३९० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथक १ ने केली.