नाम आणि त्याचे माहात्म्य या गोष्टी त्रिकालाबाधित !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) बोलू लागले, म्हणजे ते ध्वनीमुद्रित (रेकॉर्ड) करून घ्यावे, यासाठी एकाने ध्वनीमुद्रक (टेपरेकॉर्डर) लावला. त्याला उद्देशून श्रीमहाराज म्हणाले, ‘अहो, हे यंत्र कुणासाठी असते ? सध्याच्या राजकारणातील पुरुष जी आश्वासने देतात, ‘ती आपण दिलीच नव्हती’, असे मागाहून म्हणतात, आपले शब्द फिरवतात. त्यांना तसे करता येऊ नये; म्हणून ते जे बोलतात, ते त्यांना जसेच्या तसे ऐकवण्यासाठी या यंत्राचा शोध लागलेला आहे. माझ्या संदर्भात हे लागू नाही. मला बोलता येऊ लागल्यापासून या क्षणापर्यंत भगवंताच्या नामाच्या महती व्यतिरिक्त मी काही बोललोच नाही आणि ते कधी पालटण्याचा संभव नाही. तेव्हा माझ्या संदर्भात या यंत्राचा उपयोग नाही. तरीही तुमचे सर्वांचे मन राजी राखण्यास यंत्र चालू केल्यास माझी हरकत नाही.’

(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक : ल.ग. मराठे)