श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांचे आश्वासन !
नवी देहली : कुणालाही श्रीलंकेच्या भूमीचा वापर भारताच्या विरोधात करू देणार नाही, असे आश्वासन श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी दिले. ते राष्ट्रपती झाल्यानंतर ते २ दिवसांच्या भारताच्या दौर्यावर आले आहेत. त्यांनी येथे पंतप्रदान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली. त्या वेळी त्यांनी वरील आश्वासन दिले. अनुरा कुमार दिसानायके राष्ट्रपती झाल्यानंतरचा हा त्यांना पहिलाच विदेश दौरा आहे.
राष्ट्रपती दिसानायके म्हणाले की,
श्रीलंका भारताच्या साहाय्याने पुढे जाईल आणि शेजारी देशाला पाठिंबा देत राहील. सुमारे २ वर्षांपूर्वी आम्ही मोठ्या आर्थिक संकटाचा सामना केला होता. त्या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी भारताने आम्हाला पुष्कळ साहाय्य केले. भारताच्या परराष्ट्र धोरणात श्रीलंकेचे महत्त्वाचे स्थान असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी मला सांगितले आहे. पंतप्रधान मोदी मला असेही म्हणाले की, राष्ट्रपती झाल्यानंतर तुम्ही तुमच्या पहिल्या परदेश दौर्यासाठी भारताची निवड केली, याचा मला आनंद आहे. या भेटीमुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये नवी ऊर्जा निर्माण होत आहे. आम्ही आपल्या भागीदारीसाठी भविष्यवादी दृष्टीकोन स्वीकारला आहे.
श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी राजघाट येथे मोहनदास गांधी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण केले. ते म्हणाले की, गांधी यांची सत्य आणि अहिंसा यांची शाश्वत मूल्ये जगभरातील मानवतेला प्रेरणा देत आहेत. (भारतातील हिंदूंना या मूल्यांमध्ये किती फोलपणा आहे, हेही आता लक्षात येऊ लागले आहे. या कथित मूल्यांमुळे हिंदूंचा आत्मघात झाला, त्यांच्या देशाचे दोन तुकडे झाले ! – संपादक)