५१ टक्के आध्यात्मिक पातळीची लक्ष्मेश्वर (धारवाड, कर्नाटक) येथील कु. अनुषा विरूपाक्ष कुंबार (वय १३ वर्षे) !                          

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. अनुषा विरूपाक्ष कुंबार ही या पिढीतील एक आहे !           

लक्ष्मेश्वर (धारवाड, कर्नाटक) येथील कु. अनुषा कुंबार हिचा नुकताच वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘कु. अनुषा शाळेत जातांना मनात प्रार्थना करते. 

२. सत्सेवा आणि घरकाम यांत साहाय्य करणे 

ती सर्व सत्सेवांमध्ये सहभागी होते, तसेच ती मला घरकामात साहाय्य करते. ती तिच्या शाळेतील शिक्षकांना सात्त्विक उत्पादने नेऊन देते. ती तिच्या शाळेतील शिक्षकांना साधना सांगते. ती ‘सनातन प्रभात’ची माहितीही इतरांना देण्याचा प्रयत्न करते.

३. नेतृत्व गुण 

एकदा लक्ष्मेश्वर (धारवाड) येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभेचे आयोजन होते. तेव्हा तिने छोट्या मुलांची वेषभूषा करायचे दायित्व घेतले. ही सेवा ती संबंधित साधकांना विचारून करत होती. ‘मी धर्मसभेत सूत्रसंचालन करीन’, असा विचार तिने व्यक्त केला.

४. गुरूंप्रती भाव 

‘तिला आवडणारी कोणतीही वस्तू मिळाल्यास ती वस्तू गुरूंच्या कृपेने मिळाली आहे’, असे ती सांगते. तिचे गोव्याला जन्मोत्सवाला जाण्यासाठी नाव होते. तेव्हा तिला पुष्कळ कतज्ञता वाटली. ‘माझ्यावर गुरूंची कृपा आहे. मी पुण्य केले असेल. मी धन्य आहे’, अशी तिने कृतज्ञता व्यक्त केली.

५. स्वभावदोष 

सांगितलेले न ऐकणे.’

– सौ. मंगला कुंबार (आई), लक्ष्मेश्वर, धारवाड, कर्नाटक (२७.५.२०२४)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJckमार्गिकेवरही पाहू शकता.