मिथ्या म्हणजे काय ?

प.पू. स्वामी वरदानंद भारती

व्यवहारामध्ये मिथ्या आणि असत्य हे दोन शब्द सामान्यतः सारख्याच अर्थाचे मानले जातात; पण शास्त्रदृष्ट्या त्यात अंतर आहे. दोरीवर भासणारा साप हा मिथ्या आहे. जे वस्तूतः जसे नाही, तसे ते अज्ञानाने, मोहाने, वैयक्तिक दुर्बलतेने भासणे, हे मिथ्यापणाचे स्वरूप. दंभ हाही मिथ्याच. तेव्हा सत्याचा पुरस्कार करावा, सत्य ओळखावे.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ग्रंथ ‘मनोबोध’)