‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात १४ आणि १५.५.२०२३ या दिवशी चंडियाग होता. त्या दिवशी चंडियागाचे संगणकीय प्रणालीद्वारे प्रक्षेपण पहातांना साधिकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. कु. रुची पवार, राजस्थान
१ अ. यज्ञात काही क्षणांसाठी हवनासारखा सुगंध येणे आणि यज्ञाचे चैतन्य गुरुदेवच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) पाठवत असणे : ‘मला २ दिवस गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने यज्ञाचे चैतन्य लाभले आणि गुरुदेवांचे प्रत्यक्ष दर्शन होऊ शकले. पहिल्या दिवशी यज्ञात काही क्षणांसाठी हवनासारखा सुगंध आला. मी आजूबाजूला पाहिले; परंतु तसे काहीच नव्हते. तेव्हा मला असे वाटले, ‘यज्ञाचे चैतन्य गुरुदेवच तेथून पाठवत आहेत.’ त्यासाठी माझ्याकडून आपोआप कृतज्ञता व्यक्त झाली.
१ आ. ‘आत आणि बाहेर सर्व ठिकाणी केवळ एकच तो परमेश्वर असून दुसरे, तिसरे कुणीच नसणे आणि तेव्हा ‘वेगळे असे काहीही नसणे’, असा विचार येऊन डोळ्यांतून भावाश्रू येणे : दुसर्या दिवशी यज्ञ आरंभ होण्यापूर्वी श्लोक म्हणतांना गुरुदेवांचे स्मरण होत होते. त्या वेळी मला असे वाटत होते ‘भाव म्हणजे काय ? आणि तो जागृत कसा होतो ? हे आम्हाला ठाऊकच नव्हते. ती सर्व गुरुकृपाच असते. तेच साधकांना सर्वकाही देतात आणि शेवटी साधकांचे सर्वकाही त्यांच्याकडेच पोचते. ‘आत आणि बाहेर सर्व ठिकाणी केवळ एकच तो परमेश्वर असून दुसरे, तिसरे कुणीच नसते. तेव्हा वेगळे असे काहीही नसते’, असा विचार येऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले.
१ इ. यज्ञात दुसर्या दिवशी भावाचे महत्त्व आणि भावजागृती करण्याचे प्रयत्न सांगण्याचा उद्देश असणे असे श्री. विनायक शानभाग यांनी सांगणे आणि गुरुकृपेने ईश्वराने आधीच त्याची जाणीव करून दिल्याचे वाटणे : श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४१ वर्षे) यांनी सांगितले, ‘‘पहिल्या दिवशी यज्ञात ईश्वराला प्रार्थना करण्याचे काय महत्त्व आहे, हे सर्वांना शिकायला मिळाले. आज दुसर्या दिवशी भावाचे महत्त्व आणि भावजागृती करण्याचे प्रयत्न सांगण्याचा उद्देश आहे.’’ त्यांनी सांगितल्यानंतर मला असे वाटले, ‘गुरुकृपेने ईश्वराने आधीच त्याची जाणीव करून दिली होती.’ यज्ञाचे मूळच हे होते. त्यामुळे ‘भाव म्हणजे काय असतो ? हे खरे म्हणजे आम्हाला ठाऊक नव्हते’, असा विचार माझ्या मनात येत होता. ‘श्री गुरूंच्या कृपेने हे सर्व अनुभवता आले’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
२. कु. मनीषा माहुर (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), मथुरा सेवाकेंद्र
२ अ. यज्ञ आरंभ होण्यापूर्वी विद्युत् पुरवठा खंडित होणे आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी नामजपादी उपाय सांगितल्यावर विद्युत् पुरवठा सुरळीत चालू होणे अन् ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आध्यात्मिक स्तरावर कार्य कसे चालू असते ?’, हे शिकायला मिळणे : ‘१४.५.२०२३ या दिवशी यज्ञ आरंभ होण्यापूर्वी विद्युत् पुरवठा खंडित झाला होता आणि माझे नियोजन दुसर्या ठिकाणी केले होते. सद्गुरु मुकुल गाडगीळकाकांना विद्युत् पुरवठा खंडित झाल्याचे सांगून त्यावर उपाय विचारून घेतले होते. तेव्हा सद्गुरु काकांनी सांगितले होते,‘‘चिंता करू नका. विद्युत् पुरवठा पूर्ववत् चालू होईल.’’ थोड्या वेळानंतरच सेवाकेंद्रातील एका साधकाचा मला संदेश आला की, विद्युत् पुरवठा चालू झाला आहे आणि त्याच वेळी सद्गुरु गाडगीळकाकांचाही भ्रमणभाष आला अन् त्यांनी विचारले ‘‘विद्युत् पुरवठा चालू झाला का ?’’ गुरुदेवांचे आध्यात्मिक स्तरावर कार्य कसे चालू असते, हे मला शिकायला मिळाले. यज्ञाचा कार्यक्रमही निर्विघ्नपणे पार पडला.
२ आ. यज्ञ पहायला जातांना मार्गामध्ये पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्या घराजवळून जातांना पुष्कळ सुगंध येणे आणि यज्ञामध्ये ‘गोविंदा गोविंदा’ म्हणतांना अंगावर रोमांच येणे : यज्ञाच्या वेळी ज्या ठिकाणी यज्ञ पहायला जायचे होते. तेथे जातांना असे वाटत होते, ‘भगवान श्रीकृष्ण माझ्या मागे बसले आहेत. ‘उन्हामुळे उकाडा जाणवत असूनही मला यज्ञाची उब लागत आहे’, असे मला वाटत होते. यज्ञ पहायला जातांना मार्गामध्ये पू. संजीव कुमार (सनातनचे ११५ वे (समष्टी) संत) आणि पू. (सौ.) माला कुमार (सनातनच्या ११६ व्या (समष्टी) संत) यांचे घर लागते. त्यांच्या घराच्या जवळून जातांना पुष्कळ सुंदर सुगंध आला आणि कोकिळेचा आवाज ऐकू आला. वरून जाणार्या पुलाच्या (फ्लायओव्हर ब्रीजच्या) खालून जातांना मला वाटत होते, ‘भगवान श्रीकृष्णाचा हात माझ्या डोक्यावर आहे आणि मी त्या हाताच्या सावलीखालून चालले आहे.’ जेव्हा ‘गोविंदा गोविंदा’ म्हटले जात होते. तेव्हा अंगावर रोमांच येत होते.
२ इ. यज्ञ पहात असतांना सहस्रारावर काहीतरी फिरत असल्याचे वाटणे आणि सेवाकेंद्रात आल्यानंतर त्याच ठिकाणी गरम झाल्याचे जाणवणे : १४.५.२०२३ या दिवशी यज्ञ पहात असतांना अर्धा यज्ञ झाल्यानंतर ‘माझ्या सहस्रारावर काहीतरी फिरत आहे’, असे मला वाटत होते. सेवाकेंद्रात आल्यानंतर थोडा वेळ त्याच स्थितीत होते आणि सहस्रारावर हात ठेवल्यावर तेथे गरम झाल्याचे मला जाणवले.’
(क्रमश:)
(सर्व सूत्रांचा दिनांक १९.१२.२०२३)
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/851204.html
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |