संतप्त हिंदूंनी मुसलमानाच्या दुकानाची केली तोडफोड
पौडी गढवाल (उत्तराखंड) – येथे एका अल्पवयीन हिंदु मुलीच्या अचानक गायब झाल्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी ‘लव्ह जिहाद’चा आरोप करत मुसलमानाच्या दुकानाची तोडफोड केली. संतप्त लोकांनी मुलीवर विनयभंग आणि धर्मांतर यांसाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. मुख्य सूत्रधार केशकर्तनालय चालवणारा सलमान असल्याचे बोलले जात आहे.
१. कीर्ती नगर भागात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या पालकांनी त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत केली होती. पोलिसांनी अज्ञातांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला होता. मुलगी बेपत्ता होण्यामागे सलमान नावाच्या केशकर्तनालय चालवणार्याचा हात असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. अनेक दिवसांपासून तो त्यांच्या मुलीचा विनयभंग करत होता आणि तिच्यावर मुसलमान होण्यासाठी दबाव आणत होता. पीडिता बेपत्ता झाल्यानंतर सलमानही त्याचे दुकान बंद करून पसार झाला आहे.
२. मुलीच्या अपहरणाची बातमी परिसरात पसरताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. आजूबाजूचे लोक कीर्ती नगर शहरात जमा झाले आणि त्यांनी विरोध चालू केला. आरोपीच्या दुकानाची तोडफोड करण्यात आली. सलमानच्या दुकानासमेवत आणखी एका मुसलमानाच्या दुकानालाही लक्ष्य करण्यात आले. सलमान हा मूळचा उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात असलेल्या नजीबाबादचा रहिवासी आहे.
३. वरिष्ठ पोलीस अधीक्षक आयुष अग्रवाल यांनी सांगितले की, पोलिसांची अनेक पथके बेपत्ता मुलीच्या शोधात व्यस्त आहेत. यात किती जणांचा सहभाग आहे, याचाही तपास चालू आहे.
४. पौडी गढवाल जिल्ह्यातील भाजपचे उपाध्यक्ष लखपत सिंह भंडारी म्हणाले की, पोलिसांनी योग्य कारवाई केली असती, तर ही घटना घडली नसती.
संपादकीय भूमिकाहिंदू संतप्त झाल्यावर कायदा हातात घेतात; मात्र लव्ह जिहादच्या घटना काही थांबत नाहीत. कारण हिंदु मुलींना धर्मशिक्षण मिळत नसल्याने त्यांना त्यांच्या धर्माचा अभिमान नसतो आणि ते मुसलमानांच्या खोट्या प्रेमात फसतात ! |