भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी बरा नाही; मग प्रपंचात सुखसोयी असल्याने होवो किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे होवो. ढोंग, बुवाबाजी इत्यादींच्या भानगडीत तुम्ही पडू नका. अगदी काहीही न केले तरी चालेल; पण ढोंग मुळीच करू नका. आपले कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून अनुसंधान अखंड टिकू द्या. आमची अशी वृत्ती बनण्यासाठी संतांच्या संगतीची आपल्याला जरूरी आहे. संतांना ज्याची आवड आहे ते आम्ही धरले नाही, म्हणून आमची वृत्ती सुधारत नाही.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
(साभार : पू. प्रा. के.वि. बेलसरे – आध्यात्मिक साहित्य)