गणपतीजवळ काय मागावे ?

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

कोकणात गणपतीचे एक जागृत स्थान आहे. श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) तेथे गेले असता एक गणपतिभक्त भेटले. त्यांचा सारा वेळ ते गणेश उपासनेमध्ये घालवत. त्यांना श्रीमहाराज म्हणाले, ‘अहो, गणपतीजवळ काय मागावे?’ त्यांना सांगता येईना. तेव्हा श्रीमहाराज  म्हणाले, ‘गणपति ही बुद्धी देणारी देवता आहे. जशी बुद्धी असते, तशी कर्मे घडतात. सद्बुद्धी असेल, तरच हातून सत्कर्मे घडतील. याखेरीज गणपति म्हणजे गणांचा अथवा इंद्रियांचा पति अथवा स्वामी ! इंद्रियांवर त्याची सत्ता चालते; म्हणून त्याची कृपादृष्टी असेल, तर इंद्रियांकडून होणारी दुष्कर्मे टळून सत्कर्मे घडत रहातील. त्याच्याजवळ मागावे की, प्रपंचात दैन्यपण नसावे आणि नाम घेण्याची दृढ बुद्धी असावी.

संकलन : श्री. श्रीप्रसाद वामन महाजन

(साभार : ‘हृद्य आठवणी’, लेखक : ल.ग. तथा बापूसाहेब मराठे यांचे पुस्तक आणि ‘श्री गोंदवलेकर महाराज’ फेसबुक)