जळगाव – १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास कह्यात घेतले आहे.
विरवाडे परिसरात दोघी बहिणी शेतात कामाला गेल्या होत्या. कामावरून मालापूरकडून दोघी घरी परत असतांना १२ वर्षीय चिमुरडीला २५ वर्षीय संशयिताने विरवाडे शिवारातील शेतात ओढून नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचा दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली.
हत्येनंतर संशयिताने विवस्त्र अल्पवयीन मुलीला घटनास्थळावरून १०० फूट ओढत नेत कापसाच्या शेतात फेकून दिले. मुलगी घरी परतली नसल्याने तिचा शोध घेत असता कापसाच्या पिकात तिचा अर्धनग्न अवस्थेत असलेला मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवली.
संपादकीय भूमिकामुली आणि स्त्रिया यांच्या सुरक्षित जगण्यासाठी आता रामराज्य देणारे हिंदु राष्ट्रच हवे ! |