नवी देहली : देशातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये, विशेषत: वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये होणार्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना काळा झगा आणि टोपी घालण्याची आवश्यकता नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक आदेशाद्वारे सर्व केंद्रीय रुग्णालयांना दीक्षांत समारंभात या ब्रिटीश वसाहतवादी चिन्हाचा अवलंब करण्याऐवजी भारतीय पोशाख धारण करण्याचे निर्देश दिले आहेत.
Henceforth, the dress code for the convocation ceremony will not be in the British period black robe (‘gown’), but in Indian attire !
Applaudable decision by the Union Government.
Read More :https://t.co/U1EkVf9FWK
Now steps should be taken to change the present English… pic.twitter.com/eNfoxGjVga
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 26, 2024
आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, काळा झगा आणि टोपी घालणे, हा वसाहती काळाचा वारसा आहे. हे भारतीय संस्कृतीला अनुसरून नाही. दीक्षांत समारंभात परिधान केला जाणारा पोशाख हा संस्था ज्या राज्यातील आहे, त्या राज्यातील पोशाख आणि परंपरा यांवर आधारित असावा. आता हा वसाहतवादी वारसा पालटण्याची आवश्यकता आहे. हा निर्णय म्हणजे भारताच्या वसाहतवादी वारशापासून दूर जाण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.
संपादकीय भूमिकाकेंद्र सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! आता सध्याची इंग्रजी शिक्षणपद्धत पालटून तीही पूर्णपणे भारतीयच करण्यासाठी पावले उचलावीत ! |