पॅरिस (फ्रान्स) – इजिप्तचा कुस्तीपटू महंमद अलसाईद याला फ्रेंच पोलिसांनी अटक केली आहे. त्याने येथील एका कॅफेमध्ये एका महिलेसमवेत अश्लील कृत्य केल्याच्या आरोपावरून त्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली. या वेळी तो मद्याच्या नशेत असल्याचेही बोलले जात आहे.
२६ वर्षीय महंमद अलसाईद हे कुस्ती जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. पॅरिस ऑलिंपिकमध्ये अलसाईदला ६७ किलो ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. ‘युनायटेड वर्ल्ड रेसलिंग असोसिएशन’ने २३ वर्षांखालील सर्वोत्कृष्ट कुस्तीपटू म्हणूनही त्याची निवड केली होती. अलसाईदने वर्ष २०२१ मध्ये झालेल्या टोकियो ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
इजिप्तच्या ऑलिंपिक समितीची भूमिका !
इजिप्तच्या ऑलिंपिक समितीने घोेषणा केली की, अलसाईदला शिस्तभंगाच्या सुनावणीला सामोरे जावे लागेल. समितीच्या म्हणण्यानुसार आरोप सिद्ध झाल्यास त्याला खेळावरील आजीवन बंदीसह अनेक परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
संपादकीय भूमिकाआता कुणी या घटनेवरून या कुस्तीपटूचा धर्म आणि महिला अत्याचार यांचा संबंध जोडल्यास आश्चर्य वाटू नये ! |