प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !
प्रश्न : कश्च व्याधिः अनन्तकः ?
अर्थ : न संपणारा, न बरा होणारा रोग कोणता ?
उत्तर : लोभः अनन्तकः व्याधिः ।
अर्थ : लोभ हाच न संपणारा, न बरा होणारा रोग आहे.
लोभ हा रोग बरा होत नाही. लोभ संपत नाही; पण तो अधिकाधिक वाढत रहातो. हे आणखी वाईट आहे. आपण स्वतः काहीच नव्हतो, तेव्हा ‘ग्रामपंचायतीत निवडून यावे’, असे वाटते. मग क्रमाने तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष पदावर दृष्टी ठेवतो. मग ‘विधानसभेत निवडून यावे’, असे वाटते. मग राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री आणि शेवटी पंतप्रधान व्हावे, असे वाटते. हे काहीच साध्य झाले नाही, तर राज्यपाल, राजदूत यांतील काही तरी पदरात पडावे, असे वाटत रहाते. एकूण काय, तर लोभ कुठे थांबत नाही, हे खरे ! प्रत्येक क्षेत्रात असेच होते. त्यामुळे सगळे काही ठीक असतांना माणसे दुःखी दिसतात. तळमळतांना आढळतात. लोभाला न बरा होणारा रोग म्हटले आहे ते यासाठीच !
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)
(साभार : ‘यक्षप्रश्न’ या ग्रंथातून)