निपाणी (कर्नाटक) – महाराष्ट्रातील कु. यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्या नराधमाला भरचौकात फाशी द्या आणि हिंदू तरुणींचे संरक्षण होण्यासाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करा, तसेच धारावी (मुंबई) येथे अरविंद वैश्व या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करणार्या धर्मांधांना तात्काळ अटक करा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने तहसीलदार प्रवीण कारंडे यांना निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी बजरंग दलाचे श्री. अजित पारळे, ‘श्रीराम सेना कर्नाटकचे श्री.अमोल चेंडके, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. राजेश आवटे, धर्मप्रेमी श्री. अभिनंदन भोसले, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री अनिल बुडके, योगेश चौगुले, निगोंडा पाटील, सर्वश्री आप्पासो जबडे, राहुल पाटील, मधुकर पाटील, सर्वश्री सुदाम चव्हाण,अक्षय वाघेला, रवींद्र शिंदे, विशाल मोहिते, प्रशांत घोडके, विशाल जोरापुरे, संतोष देवडकर, आतिश चव्हाण, अमोल साळोखे, रोहन पवार उपस्थित होते.