वर्ष २०१४ मध्ये मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यावर द्विपक्षीय दौर्याचा प्रारंभ भूतान आणि नेपाळ या देशांपासून झाला. वर्ष २०१९ ला दुसर्यांदा पंतप्रधान झाल्यावर दौर्याचा प्रारंभ श्रीलंका आणि मालदीव यांपासून झाला. आता वर्ष २०२४ मध्ये तिसर्यांदा पंतप्रधान झाल्यावर द्विपक्षीय दौर्याचा प्रारंभ रशियापासून होत आहे (इटली दौरा ‘जी-७’ संघटनेसाठी बहुपक्षीय होता). यावरून पुढील काळात रशियाचे भारतासाठीचे महत्त्व अधोरेखित होते. रशियाच्या ज्या उपपंतप्रधानांनी पंतप्रधान मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले, त्याच व्यक्तीने चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचेही रशिया दौर्यात स्वागत केले होते. यावरून रशियाने ‘आपण भारत आणि चीन यांच्यामध्ये भेद करत नाही’, हा संदेश चीनसह जगाला दिला आहे. (१०.७.२०२४)
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरणांचे विश्लेषक, पुणे.