Jharkhand MLA Oaths Quran Verses : कुराणातील आयते म्हणत मंत्रीपदाची शपथ !

  • झारखंडमधील घटना

  • राष्‍ट्रगीताचाही केला अवमान !

  • भाजपकडून पुन्‍हा शपथ घेण्‍याची मागणी

उजवीकडे हाफीजुल हसन

रांची (झारखंड) – झारखंडमध्‍ये झारखंड मुक्‍ती मोर्चा सरकारचे नवनिर्वाचित मुख्‍यमंत्री हेमंत सोरेन यांच्‍या सरकारच्‍या मंत्रीमंडळाचा विस्‍तार करण्‍यात आला. शपथविधी कार्यक्रमात माजी मुख्‍यमंत्री चंपाई सोरेन यांच्‍यासह ११ मंत्र्यांना शपथ देण्‍यात आली. या वेळी शपथ घेतांना मंत्री हाफीजुल हसन यांनी कुराणची पहिली आयते (आयते म्‍हणजे कुराणातील ओळी) ‘बिस्‍मिल्ला रहमान रहीम’ म्‍हटली. तसेच राष्‍ट्रगीताचाही अवमान केला. यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. तसेच आसामचे भाजप सरकारचे मुख्‍यमंत्री हिमंत बिस्‍व सरमा यांनीही टीका केली आहे.

राष्‍ट्रगीताच्‍या वेळी कपडे नीट केले !

शपथविधी सोहळ्‍याच्‍या वेळी राष्‍ट्रगीत वाजवले जात असतांना हाफीजुल हसन त्‍यांच्‍या गळ्‍यात गुंडाळलेला स्‍कार्फ नीट करत होते. या घटनेचा व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांतून प्रसारित झाला आहे. या घटनेवरून त्‍यांच्‍यावर टीका होत आहे.

हसन यांना पुन्‍हा शपथ देण्‍याची भाजपची मागणी

विरोधी पक्षनेते अमर बौरी आणि भाजपचे मुख्‍य प्रतोद (विधीमंडळातील  पक्षप्रमुख) बिरांची नारायण यांनी याविषयी राज्‍यपालांना निवेदन देऊन हाफीजुल हसन यांना पुन्‍हा शपथ देण्‍याची विनंती केली आहे. अमर बौरी म्‍हणाले की, शपथविधीच्‍या वेळी हाफीजुल हसन यांनी जो धार्मिक विषय जोडला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. आपली राज्‍यघटना अशा प्रकाराला अनुमती देत नाही. देशात हे काय चालले आहे ? याआधी संसदेत शपथ घेतांना एका खासदार पॅलेस्‍टाईनविषयी बोलले होते आणि आता राष्‍ट्रगीताबद्दल त्‍यांनी दाखवलेली भावना योग्‍य नाही, हे सर्वांनाच ठाऊक आहे.

काँग्रेसकडून हाफीजुल हसन यांचे समर्थन

काँग्रेसचे प्रवक्‍ते राकेश सिन्‍हा म्‍हणाले की, भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. या ठिकाणाचे सर्वांत मोठे सौंदर्य म्‍हणजे येथे सर्व धर्मांचा आदर केला जातो. जर कुणी सनातन धर्माचा असेल, तर तो ईश्‍वराच्‍या नावाने शपथ घेतो, जर कुणी इस्‍लाम धर्माचे पालन करतो तर तो अल्लाच्‍या नावाने शपथ घेतो. यात कोणती मोठी गोष्‍ट आहे ? भाजपकडे पर्याय नाही. त्‍याची चिडचिड स्‍पष्‍टपणे दिसून येते. तो केवळ राजकारण करतो. त्‍यापेक्षा अधिक काही नाही. (यातून काँग्रेसची मुसलमानप्रेमी मानसिकता पुन्‍हा एकदा स्‍पष्‍ट होते ! उद्या मुसलमान मंत्री ‘पाकिस्‍तान झिंदाबाद’ म्‍हणत असेल, तरी काँग्रेस त्‍याचेही समर्थनच करणार ! – संपादक)

हसन यांनी घेतलेली शपथ राज्‍यघटनाविरोधी !

आसामचे मुख्‍यमंत्री हिमंत बिस्‍व सरमा यांनी ‘एक्‍स’वर पोस्‍ट करत म्‍हटले की, झारखंड राज्‍यात मंत्री अशा प्रकारे शपथ घेतात का ? आम्‍ही गप्‍प बसणार नाही. विरोधी पक्षनेते अमर बौरी यांनी माननीय राज्‍यपालांना विनंती केली आहे की, हफिझुल हसन यांना पदभार स्‍वीकारू देऊ नये; कारण ही शपथ बेकायदेशीर आणि राज्‍यघटनेच्‍या विरोधात आहे.

(म्‍हणे) ‘भाजप जाणीवपूर्वक सूत्र बनवत आहे !’ – हाफीजुल हसन यांचे स्‍पष्‍टीकरण

हाफीजुल हसन यांनी स्‍पष्‍टीकरण देत सांगितले की, मंत्री असतांना यापूर्वी दोनदा अल्लाच्‍या नावाने अशाच प्रकारे शपथ घेतली होती; मात्र आता भाजपकडे कोणतेही सूत्र  उरले नाही. त्‍यामुळे हे  सूत्र बनवले जात आहे. हेमंत सोरेन कारागृहातून बाहेर आल्‍यापासून भाजपची अस्‍वस्‍थता वाढली आहे. राज्‍यपाल जेव्‍हा काही लिहितात, तेव्‍हा ते कागदाच्‍या सर्वांत वर ‘ओम’ लिहितात. याला राजकीय सूत्र बनवू नये.

संपादकीय भूमिका

मुसलमान कितीही मोठ्या पदावर पोचले, तरी ते धर्मनिरपेक्षतेचा नाही, तर स्‍वतःच्‍या धर्माचाच विचार करतात, तर हिंदु ‘धर्मनिरपेक्ष’ राहून स्‍वतःला ‘हिंदु’ म्‍हणवून घेण्‍यासही कचरतात !