सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्यासाठी बनवण्यात आलेल्या उत्सवचिन्हाचे (बिल्ल्याचे) सूक्ष्मातील जाणणार्‍या एका संतांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण

ब्रह्मोत्सव सोहळ्यासाठी बनवण्यात आलेले उत्सवचिन्ह

११.५.२०२३ या दिवशी महर्षींच्या आज्ञेनुसार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. ब्रह्मोत्सवाची स्मृती सदैव साधकांकडे रहावी; म्हणून साधकांना छातीवर लावता येतील अशी धातूची ‘उत्सवचिन्हे (बिल्ले)’ भेट देण्यात आली. या उत्सवचिन्हाचे एका संतांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण पुढे दिले आहे.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. एक संत आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेले सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील स्पंदनांचे प्रमाण

१ अ. विष्णुतत्त्वाचे वलय सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चेहर्‍याभोवती कार्यरत होणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अवतार असल्याने असे होत आहे.

१ आ. प्रीती

१ आ १. प्रीतीचे वलय उत्सवचिन्हावर असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चेहर्‍याभोवती कार्यरत होणे : असे होण्याचे कारण हे की, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सतत संत आणि साधक यांच्या साधनेचा, तसेच समष्टीच्या कल्याणाचा विचार करत असतात.

१ इ. निर्गुण चैतन्य

१ इ १. निर्गुण चैतन्याचे किरण उत्सवचिन्हातून वातावरणात प्रक्षेपित होणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे निर्र्गुण स्थितीला असल्याने असे होत आहे.

१ ई. आनंद

१ ई १. आनंदाचे वलय उत्सवचिन्हात कार्यरत होऊन ते वातावरणात प्रक्षेपित होणे : उत्सवचिन्हावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे असलेले छायाचित्र, तसेच चिन्हाची कलाकृती यांमुळे असे होत आहे.’

– एक संत (८.१२.२०२३)

सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील अधोरेखित स्पंदनांचे प्रमाण निराळे येण्याचे कारण

सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील अधोरेखित स्पंदनांचे प्रमाण हे संबंधित संतांची पातळी, काळ आणि सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता इत्यादी घटकांवर अवलंबून असते.

  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.