विशापट्टणम् (आंध्रप्रदेश) – येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये शिकणार्या १७ वर्षीय विद्यार्थिनीने २९ मार्चला महाविद्यालयाच्या वसतीगृहाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने तिच्या वडिलांना पाठवलेल्या संदेशामध्ये तिला लैंगिक अत्याचारामुळे त्रास झाल्याचे म्हटले होते. या संदेशात म्हटले होते की, क्षमा करा बाबा, मी महाविद्यालय किंवा पोलीस यांच्याकडे लैंगिक छळाची तक्रार करू शकत नाही; कारण ज्यांनी माझे शोषण केले त्यांच्याकडे माझी छायाचित्रे आहेत. तक्रार केल्यास ती छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित केली जातील. यामुळे तुम्हाला त्रास होईल.
१. या घटनेविषयी महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणाले की, वसतीगृहात लैंगिक छळाचा प्रश्नच उद्भवत नाही. मुलींच्या वसतीगृहात मुले येऊ शकत नाहीत. आम्ही सर्व विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवतो. वसतीगृहात एक महिला वॉर्डनदेखील आहे, जी याची काळजी घेते.
२. पोलीस अधिकार्याने सांगितले की, मृत विद्यार्थिनीच्या वडिलांच्या तक्रारीची नोंद करण्यात आली आहे. महाविद्यालयाचे कर्मचारी आणि विद्यार्थी यांची चौकशी केली जात आहे.
संपादकीय भूमिकामहाविद्यालयाच्या वसतीगृहात रहाणार्या विद्यार्थिनींवर महाविद्यालय प्रशासनाचे लक्ष नाही, हेच यातून लक्षात येते ! |