Dumka Murder Case : दुमका (झारखंड) येथे हिंदु मुलीला जिवंत जाळणार्‍या शाहरुखला न्यायालयाने ठरवले दोषी !

२८ मार्चला सुनावण्यात येणार शिक्षा !

आरोपी शाहरुख

दुमका (झारखंड) – येथे १६ वर्षीय हिंदु मुलीला पेट्रोल ओतून जाळणारा शाहरुख आणि त्याचा मित्र नईम यांना विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांना २८ मार्चला शिक्षा सुनावली जाणार आहे. नईम यानेच शाहरुखला मुलीला जाळण्यासाठी पेट्रोल आणून दिले होतेे.

दुमका येथे २३ ऑगस्ट २०२२ या दिवशी ही घटना घडली होती. शाहरुख या मुलीच्या शेजारीच रहात होता आणि तो तिला अनेक दिवसांपासून मैत्री करण्यासाठी विचारत होता. मुलीने ते मान्य न केल्याने संतप्त झालेल्या शाहरुखने तिच्या घराच्या खिडकीतून तिच्यावर पेट्रोल ओतले आणि आग लावून जाळले. यात ती ९० टक्के भाजल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार चालू असतांना तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी ‘शाहरुखालाही माझ्यासारखाच मृत्यू येवो’, असे ती म्हणत होती.

संपादकीय भूमिका

अशा खुन्यांना फाशीचीच शिक्षा सुनावली पाहिजे, जेणेकरून इतरांना वचक बसेल !