मणीशंकर अय्यर यांच्या मुलीने श्रीराममंदिरावरून केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर पोलिसात तक्रार !

  • सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता अजय अग्रवाल यांनी केली तक्रार !

  • त्या रहात असलेल्या सोसायटीच्या अधिकार्‍यांनीही ‘क्षमा मागा, अथवा घर सोडा’, असे सांगितले !

मणीशंकर अय्यर यांची मुलगी सुरन्या

नवी देहली – काँग्रेसचे हिंदुद्वेष्टे नेते मणीशंकर अय्यर यांची मुलगी सुरन्या यांनी काही दिवसांपूर्वी श्रीराममंदिराच्या उद्घाटनावरून मुसलमानांसाठी ३ दिवसांचा उपवास ठेवला होता. याविषयीची माहिती सांगणारा एक व्हिडिओही त्यांनी उद्घाटनाच्या २ दिवस आधी प्रसारित केला होता. यामध्ये त्यांनी राममंदिराला विरोध दर्शवला होता, तसेच ‘मुसलमानांवर अन्याय होत आहे’, असेही त्या बरळल्या होत्या. यावरून देशभरातील हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली. हिंदूंच्या भावना दुखावल्यावरून सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता आणि भाजपचे नेते अजय अग्रवाल यांनी ३ फेब्रुवारी या दिवशी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीसमवेत सुरन्या यांचा ३६ मिनिटांचा व्हिडिओही त्यांनी पोलिसांना दिला. तो दाहक असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

सौजन्य लाईव हिंदुस्थान 

याआधी सुरन्या रहात असलेल्या सोसायटीच्या अधिकार्‍यांनीही त्यांना बजावून सांगितले की, तुमच्या अशा वक्तव्यांमुळे आमच्या सोसायटीचे नाव मलीन होत आहे. एकतर क्षमा मागा अथवा सोसायटी सोडून जा !

संपादकीय भूमिका 

मणीशंकर अय्यर यांनी पाकिस्तानचे गुणगान केले होते. त्यामुळे त्यांची कन्याही हिंदुद्वेषी आणि धर्मांधप्रेमी असल्यास आश्‍चर्य ते काय ?