श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथील प्रसिद्ध मार्तंड सूर्य मंदिरात असलेल्या श्रीराममंदिरात कलशाची स्थापना करण्यात आली. अयोध्येतील श्रीराममंदिरातील श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी देशातील निवडक श्रीराममंदिरांमध्ये तेथून कलश पाठवण्यात आले आहेत.
सौजन्य : टेक वन
मार्तंड सूर्यमंदिर हे त्यांपैकीच एक आहे. हे मंदिर १ सहस्र ७०० वर्षे जुने आहे. या मंदिरावर मुसलमान आक्रमकांनी आक्रमण करून तोडफोड केल्याने येथे सध्या त्याचे केवळ अवशेष उरले आहेत.