देवस्थानच्या विकासकामांसाठी भेट घेतल्याचे स्पष्टीकरण
मुंबई – पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी २ जानेवारी या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री आणि विधी अन् न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मेघदूत’ या निवासस्थानी विश्वस्तांनी भेट घेतली. या वेळी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत आणि भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख हेही उपस्थितीत होते. ही भेट देवस्थानच्या विकासकामांसाठी घेण्यात आल्याचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीकडून सांगण्यात आले. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील अनागोंदी कारभार, देवस्थानमध्ये भ्रष्टाचार करणार्यांची पाठराखण, मंदिरातील अर्पणाचा अपव्यय आदी कारणास्तव मागील काही दिवसांपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती चर्चेत आहे.