RSS Hijab Ban : धाडस असेल, तर हिजाबबंदी उठवून दाखवा ! – रा.स्व. संघाचे नेते कल्डका प्रभाकर भट

रा.स्व. संघाचे नेते कल्डका प्रभाकर भट यांचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना आव्हान !

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापलेले  वस्त्र)

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व रा.स्व. संघाचे नेते कल्डका प्रभाकर भट

मंड्या (कर्नाटक) – काँग्रेस सरकार ‘हिजाब परत आणणार’ (हिजाबबंदी उठवणार), असे म्हणत आहे. सरकार शाळकरी मुलांमध्ये पुन्हा फुटीरतेचे विषारी बीज पेरण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हीच गणवेष निर्माण केला आणि आता त्यात तुम्हीच फूट पाडत आहात. तुमच्यात धाडस असेल, तर पुन्हा शाळेत हिजाब परिधान करण्याचा आदेश आणून दाखवा, असे आव्हान रा.स्व. संघाचे नेते कल्डका प्रभाकर भट यांनी येथील श्रीरंगपट्टण् येथे एका कार्यक्रमात केले. राज्याचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शिक्षणसंस्थांमधील हिजाबबंदी हटवण्याविषयी विधान केले होते. त्यावरून भट यांनी वरील आव्हान दिले.

मुस्कान हिने महाविद्यालयात जाण्याऐवजी घरी किंवा मशिदीत ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) म्हणत बसावे !

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हिजाब बंदी मागे घेण्याच्या केलेल्या विधानानंतर मुस्कान नावाच्या मुसलमान तरुणीने ‘मी पुन्हा महाविद्यालयात शिकण्यास जाईन’, असे विधान केले आहे. हिजाब बंदी घालण्यात आल्यावर मुस्कान हिने तिच्या महाविद्यालयाच्या आवारात ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत याला विरोध केल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर तिला प्रसिद्धी मिळाली होती. मुस्कानच्या विधानावर कल्डका प्रभाकर भट या वेळी म्हणाले की, मुस्कान, तू घरी किंवा मशिदीत अल्लाहू अकबर म्हणत बसावे. या देशात आता रामनामच म्हणावे लागेल. अल्लाहू अकबर म्हणायचे असेल, तर तुम्ही इस्लामी देशात जावे. मुस्कान हिला शाबासकी देणारा अल् कायदा या आतंकवादी संघटनेचा सदस्य होता. मुस्कान हिचाही अल् कायदा संघटनेशी संपर्क आहे. धाडस असेल, तर मुस्कान हिने महाविद्यालयात जाऊन दाखवावे.

भारताला इस्लामी देश बनवण्यासाठी मुसलमान येथे आले !

कल्डका प्रभाकर भट पुढे म्हणाले की, या देशाला इस्लामी देश बनवण्यासाठी मुसलमान आले. गझनीच्या काळापासूनच हत्या, अत्याचार, दरोडे घालण्यात आले आहेत. काश्मीर पाकिस्तानने घेतल्यावर नेहरू आणि काँग्रेस यांनी देशाची फसवणूक केली.  ‘या देशातील संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा’, अशी घोषणा मनमोहन सिंह यांनी केली होती.

भट यांच्या विरोधात गुन्हा नोंद

मंड्या येथील सामाजिक कार्यकर्त्या नजमा नझीर यांनी केलेल्या तक्रारीनंतर कल्डका प्रभाकर भट यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आक्षेपार्ह विधाने करून धार्मिक तेढ निर्माण केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. (भट यांनी जे विचार मांडले, त्यात आक्षेपार्ह काय आहे. हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात मुसलमानांनी तक्रार केल्यावर त्याची तात्काळ नोंद घेऊन हिंदूंवर गुन्हा नोंदवणारे पोलीस, हीच तत्परता दंगल घडवणार्‍या धर्मांध मुसलमानांच्या संदर्भात दाखवत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक)