Love Jihad Law : ‘लव्ह जिहाद’च्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

धनबाद आणि बोकारो (झारखंड) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ !

धनबाद (झारखंड) – येथील गुमला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फोरी गावामध्ये ‘लव्ह जिहाद’चे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. तेथील धर्मांधांनी आदिवासी समाजातील एका हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे विविध विहिरींमध्ये फेकून दिल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी पोलिसांनी इमान मिरदहा उपाख्य बादल आणि झहीर मिरदहा यांना अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रणधीर वर्मा चौक, धनबाद आणि सिटी सेंटर, बोकारो स्टील सिटी येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनामध्ये ‘भाजपशासित राज्यांनी ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदे केले आहेत. त्याप्रमाणे केंद्र सरकारने संपूर्ण देशात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ तातडीने लागू करावा’, अशी मागणी या आंदोलनामध्ये करण्यात आली. या वेळी तरुण हिंदू, विश्व हिंदु परिषद, रा.स्व. संघ, आर्य समाज, गायत्री परिवार, गोरक्षा सनातन संस्कृती, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांचे पदाधिकारी आणि धर्माभिमानी उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. आंदोलनाचा विषय ऐकून समाजातील अनेक लोक आंदोलनात सहभागी झाले.

२. ‘आंदोलनातील लव्ह जिहादचा विषय ऐकला. तो अतिशय गंभीर असून त्याच्या विरोधात कायदा झालाच पाहिजे. आम्ही तुमच्यासमवेत आहोत’, अशा प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केल्या.

अयोध्यानगरी मद्य आणि मांसमुक्त करा ! – डॉ. निशांत दास, सचिव, ‘तरुण हिंदू’

अयोध्येतील राममंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ ला करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण अयोध्येत मद्य आणि मांस यांवर बंदी घालण्यात यावी. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)