|
नागपूर – सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील साखरपेठ परिसरात भाग क्रमांक २८१ आणि ‘सिटी सर्व्हे क्रमांक ९९८०’ मध्ये गेल्या १५० वर्षांपासून मोठ्या प्रमाणात हिंदू रहात आहेत. हे हिंदू तेथे नियमितपणे महानगरपालिकेला कर भरतात, तसेच ‘सात-बारा’ उतारा हिंदूंच्या नावावर आहे. असे असतांना ‘वक्फ बोर्डा’च्या माध्यमातून वारंवार हिंदूंना नोटीस देऊन घरे बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशिष्ट समाजाकडून हिंदूंना घरे सोडण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत. यामुळे हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे तेथील हिंदूंना न्याय मिळावा, अशी मागणी भाजपचे आमदार श्री. प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत केली. यावर उत्तर देतांना ग्रामविकासमंत्री श्री. गिरीश महाराज यांनी ‘या संदर्भात सखोल अन्वेषण करून तात्काळ कारवाई करण्यात येईल’, असे आश्वासन दिले.
या संदर्भात अधिक माहिती देतांना आमदार श्री. प्रसाद लाड म्हणाले, ‘‘या सर्व गोष्टींसाठी उत्तरदायी असणारे मुसलमान समाजाच्या एका संस्थेचे विश्वस्त शासनाच्या परिवहन विभागात सेवेत आहेत. शासनात काम करणार्या व्यक्तीस विश्वस्त होता येत नाही. असे असूनही ते या संस्थेत विश्वस्त आहेत; मात्र त्याची धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंद नाही. या संदर्भात पोलिसांत तक्रार केल्यानंतरही पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. यामुळे कायदा-सुव्यस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून तेथून हिंदू पलायन करत आहेत. तरी शासनाने तात्काळ लक्ष घालून हिंदु समाजाला न्याय द्यावा.’’
संपादकीय भूमिकाया अन्यायाच्या विरोधात समस्त हिंदूंनी संघटित होऊन आवाज उठवणे आवश्यक ! |