Dhiraj Sahu Raid : काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडून एकूण ३५४ कोटी रुपयांची रोकड जप्त !

नोटा मोजायला लागले ५ दिवस !

काँग्रेसचे खासदार धीरज साहू

रांची (झारखंड) – आयकर विभागाने काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या ठिकाणांवर गेल्या ५ दिवसांपासून चालू असलेली धाड आता संपली आहे. यात आतापर्यंत ३५४ कोटी रुपयांची रोकड सापडली आहे. या नोटा मोजण्यासाठी ५ दिवस लागले.  एखाद्या सरकारी यंत्रणेने एका छाप्यात हस्तगत केलेली ही आतापर्यंतच्या इतिहासातली सर्वांत मोठी रक्कम असल्याचे सांगितले जात आहे.

आयकर विभागाने या नोटा १७६ बॅगांमध्ये भरून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बालंगीर, संबलपूर आणि तितलागड शाखांमध्ये नेल्या. या नोटा मोजण्यासाठी एकूण २५ यंत्र आणि ५० बँक कर्मचारी दिवस-रात्र काम करत होते. ही रोकडे कुठून आली ?, याचा आता शोध घेतला जात आहे.

संपादकीय भूमिका

अशा भ्रष्ट नेत्यांचा भरणा असलेल्या काँग्रेसवरच आता सरकारने बंदी घातली पाहिजे !