या वाहिनीच्या‘आरिफ’ नावाच्या प्रतिनिधीने केले वार्तांकन !
मुंबई, २७ नोव्हेंबर (वार्ता.) – डोंगरी येथील रेहमानशाह बाबाच्या दर्ग्यातील उरुसाच्या मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजात डी.जे. लावल्यामुळे या परिसरातील वाद निर्माण झाला. प्रत्यक्षात मात्र ज्यामुळे वाद निर्माण झाला, ती बाजू न मांडता या उद्दामपणाच्या विरोधात रस्त्यावर उतरणार्या हिंदूंना ‘मुंबई ब्रेकिंग न्यूज’ या यू ट्यूब वाहिनीवरून दंगलखोर ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. येथून प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये हिंदूंनीच वाद निर्माण केला असल्याचे भासवण्यात आले आहे.
हिंदूंनी पोलिसांत प्रविष्ट केलेल्या तक्रारीमध्येही उरुसामध्ये कर्णकर्कश आवाजातील डी.जे.ला विरोध केला आहे. येथील श्री नागेश्वर महादेव गोल मंदिराच्या ठिकाणी मिरवणूक आल्यावर डी.जे.चा आवाज वाढवण्यात येत होता. याविषयी प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्येही रस्त्याच्या आजूबाजूचे लोक कानांवर हात ठेवून उभे असल्याचे दिसून येत आहे. या विरोधात हिंदूंनी पोलिसांना १०० क्रमांकावर वारंवार तक्रार प्रविष्ट करण्यासाठी संपर्क करूनही पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे हिंदू आक्रमक झाले. त्यांना नाईलाजाने रस्त्यावर उतरावे लागले. ही वस्तुस्थिती न मांडता ‘मुंबई ब्रेकिंग न्यूज’ या यु ट्यूब वाहिनीवरून रस्त्यावर उतरलेल्या हिंदूंनी ‘हिंदूबहुल भागातून मुसलमानांनी मिरवणूक काढू नका’, या मागणीचा व्हिडिओ दाखवून हिंदूंना जाणीवपूर्वक चिथावणीखोर दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये जाणीवपूर्वक कोणत्या हिंदूंची प्रतिक्रिया न दाखवता केवळ एका मुसलमान व्यक्तीची प्रतिक्रिया दाखवण्यात आली आहे. या वृत्तामध्ये माहिती देणार्या ‘आरिफ’ नावाच्या या वाहिनीच्या प्रतिनिधीने हिंदूंवरच कारवाई करण्याची मागणी केली आहे.
(सौजन्य : MUMBAI TV)
संपादकीय भूमिकादंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करून त्याविरोधात आवाज उठवणार्या हिंदूंनाच दंगलखोर ठरवणार्या धर्मांधांचा कावेबाजपणा ओळखा ! |