मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय !
मुंबई – राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ घोषित करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ते साहाय्य करण्याविषयी तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे.
‘राज्यातील उर्वरित तालुक्यांमधील ज्या भागांत अल्प पाऊस झाला आहे, त्यासंदर्भात आवश्यक ते निकष निश्चित करून तिथे दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून सवलती देण्यासाठी मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा’, असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानुसार दुसर्या टप्प्यात देण्याच्या साहाय्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात येतील.