गुजरातमध्ये ८०० कोटी रुपयांचे कोकेन जप्त

सुरत (गुजरात) – गांधीधाम पोलिसांनी ८०० कोटी रुपयांचे ८० किलो कोकेन जप्त केले आहे. पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून येथील अमली पदार्थांच्या तस्करीवर लक्ष ठेवून होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही संपूर्ण कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या भीतीने तस्कर अमली पदार्थ येथे सोडून पळून गेले, असे सांगण्यात येत आहे.

गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले की, अलीकडच्या वर्षांत गुजरात पोलिसांनी जितके कोकेन जप्त केले आहे तितके इतर कोणत्याही राज्याने पकडले नाही. कोकेनची विक्री कोठून होते ?, मोठा पुरवठा कुठून होतो ?, याची संपूर्ण माहिती घेऊन ही कारवाई करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय संबंध असलेल्या आरोपींना अटक करण्यात गुजरात पोलिसांना यश येत आहे.

संपादकीय भूमिका 

पकडण्यात आलेले कोकेन इतके आहे, तर न पकडले गेलेले आणि समाजात विकण्यात येत असलेले कोकेन किती असेल ? याची कल्पना करता येत नाही !