चीनच्या भिंतीला भगदाड पाडणार्‍या दोघांना अटक

कामावर जाण्यास अडथळा येत असल्याने पाडल भगदाड !

बीजिंग (चीन) – जगातील ७ आश्‍चर्यांपैकी एक असलेल्या चीनच्या भिंतीला भगदाड पाडणार्‍या २ बांधकाम कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली आहे. यात ३८ वर्षांचा पुरुष आणि ५५ वर्षांची महिला यांचा समावेश आहे.

या दोघांना भिंतीमुळे कामावर जाण्यास अडथळा यायचा, तसेच नियोजित ठिकाणी पोचण्यास बराच वेळ लागायचा. त्यामुळे त्यांनी भिंतीचा काही भाग पाडून मार्ग निर्माण केला. चीनच्या शांक्सी प्रांतात हे भगदाड पाडण्यात आले आहे. यासाठी खोदकाम करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या यंत्राचा वापर करण्यात आला. ‘भिंतीची झालेली हानी पुष्कळ मोठी असून त्याची भरपाई केली जाऊ शकत नाही’, असे पोलिसांनी म्हटले आहे.