पाकिस्तानमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या अपहरणाच्या विरोधात अल्पसंख्यांकांचा मोर्चा !

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये हिंदूंसह इतर अल्पसंख्यांकांवर अत्याचार केले जात आहेत. अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांवर प्रतिदिन आक्रमणे होत आहेत. आता पाकिस्तानातील हिंदु अल्पसंख्य समुदायासह इतर समुदायही या अत्याचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. पाकिस्तानच्या सुक्कूरमध्ये धर्मांधांकडून हिंदूंचे अपहरण करण्यात आले. अपहरण करणार्‍या धर्मांधांना शोधण्यात पोलिसांना अपयश आल्याच्या निषेधार्थ सहस्रावधी लोकांनी नुकताच मोर्चा काढला आणि कंधकोट शहरातील घंटाघर चौकात धरणे धरले.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आंदोलकांनी काश्मीर जिल्ह्यातील गुन्हेगारीग्रस्त कंधकोटमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पुनर्स्थापित करण्यासाठी आवाज उठवला. जिल्ह्यातील विविध भागांतील हिंदु नेते जगदीश कुमार, जयदीप कुमार, सागर कुमार, गुड्डू, मुनीर नायच आणि इतर अनेकांच्या अपहरणाच्या विरोधात आंदोलकांनी निदर्शने केली.