पीक हानीभरपाई तक्रारीसाठीची मुदत वाढवण्यासाठी केंद्राशासनाकडे मागणी करणार ! – धनंजय मुंडे, कृषीमंत्री

कृषीमंत्री धनंजय मुंडे

मुंबई – ६५ मि.मी.च्या पुढे पाऊस झाला, तर अतीवृष्टी घोषित करतो. सध्या अतीवृष्टीनंतर ७२ घंट्यांच्या आत प्रशासनाला माहिती देणे आवश्यक आहे. हा कालावधी ९२ घंट्यांचा करावा. पीक हानीभरपाई तक्रारीसाठीची ही मुदत वाढवण्यासाठीची मागणी केंद्रशासनाकडे करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिली.

राज्यातील झालेल्या अतीवृष्टीनंतर जे प्रस्ताव ७२ घंट्यांनंतर आले आहेत, त्यांचाही सरकारकडून पुनर्विचार करणार आहे. अतीवृष्टीमुळे पीकहानी झाल्याविषयी ३ लाख १२ सहस्र अर्ज आले होते. त्या सर्वांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी २७ जुलै या दिवशी विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर दिली.