रामनाथी (गोवा) – महर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी, म्हणजेच ३ जुलै २०२३ या दिवशी पूजन आणि औक्षण केले. महर्षींनी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना मोगर्याचा हार घालणे, औक्षण करणे आणि मध, खजूर अन् मनुके यांच्या मिश्रणाचा नैवेद्य अर्पण करावा’, अशा प्रकारे पूजन करण्यास सांगितले होते. यानुसार श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे भावपूर्ण पूजन आणि औक्षण केले. या वेळी महर्षींनी ५ जणांना उपस्थित रहाण्यास सांगितले होते. त्यानुसार सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, पू. पृथ्वीराज हजारे आणि पू. संदीप आळशी हे संत, तसेच श्री. भानू पुराणिक आणि श्री. सिद्धेश करंदीकर उपस्थित होते. या विधीचे पौरोहित्य सनातन पुरोहित पाठेशाळेतील श्री. अमर जोशी आणि श्री. ईशान जोशी यांनी केले.