|
भुज (गुजरात) – कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा येथील पर्ल शाळेमध्ये बकरी ईद साजरी करतांना हिंदु विद्यार्थ्यांना नमाजपठण करण्यास सांगण्यात आले. या घटनेची जिल्हा शिक्षणाधिकार्यांनी चौकशी करण्यासाठी एका पथकाची स्थापना केली आहे. ‘जर या घटनेत शाळा दोषी आढळली, तर कारवाई करण्यात येईल’, असे जिल्हा शिक्षणाधिकार्यांनी सांगितले. दुसरीकडे शाळेच्या मुख्याध्यापिका राशी गौतम यांनी याविषयी क्षमा मागितली. नमाजपठणाचे सत्र हा या कार्यक्रमाचा एक भाग होता. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. भविष्यात लोकांच्या भावना दुखावतील, असा कोणताही कार्यक्रम शाळेत साजरा केला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
महेसाणा के एक प्राइवेट अंग्रेजी मीडियम स्कूल में बकरीद के मौके पर सेलिब्रेशन रखा गया था. #BakraEid2023 #Gujarat (@gopimaniar)https://t.co/gFIAz3tRw7
— AajTak (@aajtak) June 30, 2023
२८ जून या दिवशी बकरी ईदनिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी काही हिंदु मुलेही नमाजपठण करत असल्याचा व्हिडिओ शाळेनेच सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला होता. तो पाहिल्यावर हिंदु संघटनांनी विरोध केला.
संपादकीय भूमिकाशाळेत भगवद्गीता शिकवण्याविषयी कुणी केवळ सुचवले तरी ‘शिक्षणाचे भगवेकरण होत आहे’, अशी ओरड करणारे आता हिंदु विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नमाजपठण करायला लावले असतांना ‘शिक्षणाचे इस्लामीकरण होत आहे’, असे म्हणत नाहीत, हे लक्षात घ्या ! |