अनुमतीविना इमारतीच्या आवारात बकर्‍यांची हत्या करणार्‍यांवर कारवाई करा !

  • मीरा रोड येथे इमारतीत ‘कुर्बानी’साठी मुसलमानांनी बकर्‍या आणल्याचे प्रकरण

  • मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

  • पोलिसांकडून हिंदू आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते यांच्यावर लाठीमार

मुंबईतील एका सोसायटीमध्ये बकरी ईदच्या दिवशी कोणतीही बेकायदेशीर कत्तल होणार नाही याची खात्री करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांना दिले

मुंबई – अनुमतीविना इमारतीच्या आवारात बकर्‍याची हत्या करणे अत्यंत चुकीचे आहे, असे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. मुंबईतील मीरा रोड येथील एका इमारतीत बकरी ईदनिमित्त बकर्‍या आणल्या होत्या. त्यावरून हिंदु आणि जैन कुटुंबियांना विरोध केला होता. या प्रकरणी जैन समुदायाच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. यावर २८ जून या दिवशी सायंकाळी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने अनुमतीविना इमारतीत बकर्‍यांची हत्या करणार्‍यांवर कारवाई करावी, असे निर्देश राज्य सरकार आणि मुंबई महापालिका यांना दिले आहेत.

‘मुंबई पोलिसांनी इमारतीच्या आवारात पडताळणी करावी. आवश्यकता भासल्यास इमारतीत पुरेसा बंदोबस्तही ठेवावा’, अशी सूचना न्यायालयाने दिली आहे. प्रत्यक्षात या इमारतीत ६० बकर्‍या आणल्याचा आरोप जैन धर्मियांकडून केला गेला. बकर्‍या आणल्यावर मुसलमानाला विरोध करणारे हिंदू आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते यांच्यावर पोलिसांनी लाठीमारही केला. (अशा पोलिसांवर सरकारने कारवाई करावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

पोलिसांची मोगलाई ! हिंदूंवर लाठी उगारणारे पोलीस अन्य धर्मियांना अशी मारहाण करण्याचे कधीतरी धाडस करतील का ?